“राफेल’प्रकरणी मोदींची चौकशी व्हावी : राहुल गांधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल विमान खरेदी व्यवहारात सहभाग असल्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राफेलच्या 36 विमानांच्या खरेदीतून अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवून देणारे पंतप्रधान मोदी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राफेल विमानांची उत्पादक कंपनी दसॉल्ट एव्हिएशन कंपनीला विदेशी निर्मिती भागीदार म्हणून अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सशी भागीदारी करण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध राहिला होता, अशा आशयाचे वृत्त एका फ्रेंच नियतकालिकाने बुधवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी मोदी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ राहुल यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत.
संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या गुरुवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेल्या आहेत. हा दौरा म्हणजे राफेल प्रकरण मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. सितारामन यांना अचानक फ्रान्सचा दौरा का करावा लागला, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी विचारला आहे. दसॉल्टकडून रिलायन्स डिफेन्सची निवड करण्यामध्ये सरकारचा काहीही सहभाग नव्हता असे सरकारच्यावतीने वारंवार सांगण्यात आले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)