#ProKabaddi: गुजरात फॉरचुन जाइन्ट्स विरुद्ध दबंग दिल्ली सामना बरोबरीत

प्रो कबड्डी मध्ये आज तिसाऱ्या दिवशी गुजरात फॉरचुन जाइन्ट्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील सामना 32-32 असा बरोबरीत सुटला . सामन्यात पहिल्या सत्रापासून गुजरातचे वर्चस्व होते परंतु शेवटच्या दहा मिनिटात आपला खेळ उंचावत दिल्ली संघाने सामना बरोबरीत सोडवला. यात दिल्लीचा रेडर चंद्रन रणजीत याने महत्वाचा वाटा उचलला.

पहिल्या सत्रात गुजरातचा दबदबा राहिला. पाहिले सत्र संपले तेव्हा गुजरातचा संघ 17-12 असा आघाडीवर होता. दुसऱ्या सत्राची सुरुवात देखील गुजरातने आश्वासक केली. परंतु शेवटच्या 10 मिनिटात दिल्ली संघाने आपला खेळ कमालीचा उंचावला. सामना संपण्यास 6 मिनिटे शिल्लक असताना गुणसंख्या 22-28अशी होती.

शेवटच्या पाच मिनिटे शिल्लक असताना गुजरातला ऑल आऊट करत दिल्लीने गुजरातची आघाडी 27-29 अशी कमी केली. सामना संपण्यात 1 मिनिट कमी असताना गुणसंख्या 31-31 अशी समान होती. त्यानंतर हा सामना 32 -32 असा बरोबरीत सुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)