लंडन – भारत व न्यूझीलंड हा सामना सुरू असताना खलिस्तानवादी प्रेक्षकांनी निदर्शने करीत खेळाडूंचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी या प्रेक्षकांना ताब्यात घेतले.
पंजाबला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळावी, खलिस्तान देश निर्माण करावा अशा आशयाचे टीशर्टस परिधान केलेल्या काही मोजक्या प्रेक्षकांनी घोषणाही दिल्या. या प्रेक्षकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.