नवी दिल्ली – मनिंदर सिंह यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बंगाल वाॅरियर्स संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये बेंगलुरू बुल्स संघाचा पराभव केला. बंगलाने बेंगलुरूवर 33-31 अशी मात केली. बंगाल वारियर्सकडून मनिंदर सिंह याने 14 गुण पटकाविले तर महेश गौड याने 6 गुण मिळवित त्याला चांगली साथ दिली.
बेंगलूरू बुल्सचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव असला तरी 41 गुणासह बेंगलूरू बुल्सचा संघ ब गटात अव्वलस्थानी आहे. तर बंगाल वाॅरियर्सचा हा स्पर्धेतील 6 वा विजय ठरला. बंगाल वाॅरियर्स संघ 37 गुणासह ब गटात तिसऱ्या स्थानी आहे.
If thriller had a name, #BENvKOL could sure be a contender!
Spoiling @BengaluruBulls' homecoming, Surjeet Singh and Co. picked up a stylish win tonight!
Here's the story of the match: https://t.co/DQeido5BmY pic.twitter.com/7PIzRqv3xx
— ProKabaddi (@ProKabaddi) November 23, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा