प्रो कबड्डी लीग स्पर्धा : यू मुब्माचा दणदणीत विजय

मुंबई – प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुम्बा संघाने जयपूर पिंक पँथर्स संघावर  48-24 अशा मोठ्या गुणफरकाने सहज विजय मिळवला आहे. या विजयासह यू मुब्मा अ गटामध्ये टाॅपवर पोहचली आहे. अभि्षेक सिंहने 12 आणि दर्शन कादियान याने 10 गुण मिळवित विजयात महत्वाचा वाटा उचलला.

यू मुब्वा संघाचा हा सातवा विजय ठरला आहे. यू मुब्वा 39 गुणासह अ गटामध्ये अव्वलस्थानी पोहचली आहे. यू मुब्वामुळे पुणेरी पलटण 37 गुणासह दुसऱ्या स्थानावर गेली आहे. तर दुसरीकडे जयपूर पिंक पँथर्सचा आठ सामन्यापैकी आजचा सहावा पराभव झाला आहे. या पराभवासह 12 गुणासह जयपूरचा संघ ग्रुपमध्ये शेवटच्या स्थानी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यंतरालाच यू मूम्बाकडे 26-8 अशी आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत दुसऱ्या सत्रात यू मूम्बाने 22 गुण मिळवित जयपूर पिंक पँथर्स संघावर दणदणीत विजय मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)