प्रो कबड्डी स्पर्धा 2018 : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात पटणाचा विजयी

चेन्नई – सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून दोन्ही संघाकडून सुरू असलेल्या जोरदार चढाया आणि बोनसच्या गुणाची लयलुटीमुळे हा सामना मोठा रोमहर्षक झाला. दोन्ही संघाच्या रेडरकडून आक्रमक खेळी करत बोनस तसेच गुणांची कमाई सुरूच होती. सुरूवातीस युपीचा संघ आघाडीवर होता. त्यानंतर पटणाने जोरदार मुसंडी मारत पहिला ऑल आउट केला. मात्र युपीच्या योध्दांनी काही वेळातच याची परफेड केली.

प्रदीप नरवाल ने सुपर टेन गुण घेत या सामन्यात आपली चमक दाखवून दिली. तर पटणाने युपीला या सामन्यात दोनवेळस ऑल आउट केले. युपीच्या श्रीकांत जाधवनेही सुपर टेन गुणांची कमाई केली. मात्र अखेरच्या क्षणी पटणाने हा सामना (43-41) 2 गुणांनी जिंकत या हंगामातील आपल्या संघाचा पहिला विजय नोंदवला.

-Ads-

यूपीपी योद्धा आणि पटणा पारेट्‌स यांच्यातील पहिले सत्र चांगलेच चुरशीचे झाले. यूपीच्या संघाने सुरुवातीला चांगलीच आघाडी घेतली होती. पण काही वेळात यूपीचा कर्णधार रिशांक बाद झाला. त्यानंतर पटणाने जोरदार आक्रमण लगावले आणि यूपीच्या संघावर पहिला ऑलआऊट चढवत आघाडी घेतली. पहिल्या ऑलआऊट नंतर युपीचा संघ आक्रमक झाला आणि त्यांनी सामन्यात झोकात पुनरागमन केले. पहिले सत्र संपायला एक मिनिट शिल्लक असताना दोन्ही संघांची 20-20 अशी बरोबरी होती, पण अखेरच्या मिनिटात पटणाने एक गुण मिळवला. त्यामुळे मध्यंतराच्यावेळी पटणाकडे 21-20 अशी एक गुणांची नाममात्र आघाडी होती.

पटणाने युपी योध्दाला दुसऱ्या हाफच्या काही वेळातच ऑल आउट केले. दोन्ही संघाकडून चढाईत गुणाची लयलुट सुरूच ठेवली होती. तर दोन्ही संघाच्या रेडरकडून आक्रमक खेळी करत बोनस तसेच गुणाची कमाई सुरूच होती. युपीकडून रिशांक देवाडिंगा, श्रीकांत जाधव, प्रशांत कुमार यांनी जोरदार चढाई करत संघास गुण मिळवून दिेले. तर पटणासंघाकडून प्रदीप नरवाल, दिपक नरवाल, विकास काले यांनी जोरदार चढाई केल्या.

पटणा संघास रिशांक देवाडिंगाची पकड केल्याने सुपर टॅकल गुण मिळाला. दुसऱ्या हाफमध्ये युपीने पटणाचा ऑल आउट करत गुण बरोबरीत आणले. या सामन्यात दोन्ही संघाकडून बोनसची लयलुट सुरू होती. युपीच्या श्रीकांत जाधवनेही सुपर टेन गुणांची कमाई केली. मात्र अखेरीस हा सामना पटणाने 2 गुणांनी जिंकला.

घरच्या मैदानावर तामिळ थलायवाजचा पराभवाने शेवट

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या तामिळ थलायवाजला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजवर 36-27 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. बंगालच्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळापुढे तामिळ थलायवाजचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही.

आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या तामिळ थलायवाजला बंगालविरुद्ध विजयाची नितांत गरज होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजला वरचढ होण्याची संधी दिली नाही. सामन्यात चांगली कामगिरी करुनही मोक्‍याच्या क्षणी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे तामिळला पराभव स्विकारावा लागला.

What is your reaction?
110 :thumbsup:
11 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
10 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)