पुणेरी पलटनचा पराभव करत दबंद दिल्लीने विजयाचे खाते उघडले

सोनीपत  – पुणे आणि दिल्लीमध्ये झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात दबंग दिल्लीने पुण्यावर 41-37 अशा गुण फरकांनी विजय मिळवत प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वातील आपला पहिला विजय मिळवला आहे. पहिल्या हाफमध्ये आघाडीवर असणाऱ्या पुण्याला जोरदार टक्कर देत दबंग दिल्लीने मुसंडी मारत आघाडी मिळवली. दोन्ही संघाच्या रेडर आणि टॅकल गुणामध्ये 1 गुणाचा फरक होता.

पुण्याच्या नितीन तोमरने या सामन्यात सर्वाधिक 20 गुण घेतले मात्र संघास विजय मिळवून देता आला नाही. दबंग दिल्लीने या सामन्यात पुण्याला दोन वेळेस ऑल आउट केले. अखेरच्या क्षणी बरोबरीत असलेल्या गुणतक्तात दिल्लीने आघाडी मिळवत या सामन्यात विजय मिळवला.

-Ads-

पुण्याच्या नितिन तोमरने पहिल्या चढाईपासूनच गुणाची कमाई सुरु केली होती. तर दबंग दिल्लीच्या नवीन कुमारने दोन गुण घेत गुण बरोबरीत आणले. दोन्ही संघाकडून पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ सुरू होता. पुण्यावर पहिल्या हाफमध्येच ऑल आउट होण्याची नामुष्की ओढवली. तर दबंग दिल्लीने सामन्यामध्ये आघाडी मिळवली. मात्र काही वेळातच पुण्याच्या तोमरने धडाकेबाज चढाई करत दबंग दिल्लीचा वचपा काढत ऑल आउट केले. या सामन्यातील पहिला हाफ मोठा रोमहर्षक झाला. अखेर पुण्याने दिल्लीवर 2 गुणानी आघाडी मिळवली. नितीन तोमरने पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक 14 गुणांची कमाई केली.

दोन्ही संघाच्या रेडरकडून गुणांसाठी जोरदार चढाय्या सुरू होत्या. दबंग दिल्लीने अखेर गुणफरकात आघाडी घेत सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटात 1 गुणांनी आघाडी घेतली. मात्र पुण्याकडूनही जोरदार चढाय्या सुरू होत्या. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्येही हा सामना काटे की टक्कर असाच झाला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ केला. दोघांकडून तोडीस तोड खेळ झाला.

दुसऱ्या सत्रातील पहिल्या दहा मिनिटांत सामना 28-27 असा दिल्लीच्या बाजूने होता. पुण्याने चढाई करत दिल्लीवर 33-29 अशी आघाडी घेतली. पण, दिल्ली हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी चतुराईने खेळ करताना अखेरच्या तीन मिनिटांपर्यंत पाच गुणांची आघाडी घेतली. हे चित्र पाहून पुण्याच्या खेळाडूंच चिंता वाढली होती. शेवटच्या तीन मिनिटांत ही आघाडी 8 ने वाढवत दिल्लीने विजय जवळपास पक्का करत सामना 41-37 अशा फरकाने आपल्या नावे केला.

हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले

हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघावर 32-25 असा विजय मिळवला. हरयाणाचा या पर्वातील हा पहिलाच विजय ठरला. मोनू गोयत व कुलदीप सिंग हे या विजयाचे शिल्पकार ठरले. हरयाणाचे मोनू गोयत आणि कुलदीप सिंग यांना गुजरातच्या सचिनने तोडीस तोड उत्तर दिले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमणावरच भर दिला. मात्र, बचावाच्या बाबतीत हरयाणाचे खेळाडू उजवे ठरले. त्याच जोरावर त्यांनी सामन्यात विजय संपादन केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)