Under-14 Tournament : बडोद्याच्या ‘या’ खेळाडूने केल्या ‘नाबाद 556’ धावा

बडोदा : ज्यूनिअर क्रिकेट मध्ये मुंबईच नाही तर इतर राज्यातील खेळाडूसुध्दा क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर विक्रम करताना दिसत आहेत. मंगळवारी ज्यूनियर क्रिकेट स्पर्धेत बडोद्याच्या प्रियांशु मोलिया या क्रिकेट खेळाडूने एक विक्रम अापल्या नावावर केला आहे.

14 वर्षाच्या वयात अनेक क्रिकेटमधील खेळाडू मुलं साधे शतक करू शकत नाहीत, तिथं तेरा वर्षीय ‘प्रियांशु मोलिया’ या  फलंदाजाने ‘नाबाद 556’ धावा केल्या आहेत. त्यानंतर प्रियांशु मोलिया स्थानीकच नाही तर राष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रियांशुने मोहिंदर लाला अमरनाथ क्रिकेट अकादमीकडून खेळताना बडोदा येथील ‘डी.के. गायकवाड अंडर-14’ स्पर्धेतील दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात ‘योगी क्रिकेट अकादमी’ विरूध्द  हा विक्रम केला आहे. प्रियांशु याने मंगळवारी हा विक्रम आपल्या नावे केला. फलंदाजी आधी प्रियांशुने गोलंदाजीत दमदार कामगिरी करत चार विकेट घेतल्या होत्या. याआधी 2013 मध्ये ‘पृथ्वी शाॅ’ याने नाबाद 546 धावा काढल्या होत्या. पृथ्वी याने 546 धावा अंडर 16 स्पर्धेत काढल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)