लग्नात फटाके वाजवल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोल

प्रियांका आणि निक यांचे लग्न काल 2 डिसेंबरला जोधपुरच्या उमेद भवन पॅलेस मध्ये पार पडले. या दोघांच्या लग्नानंतर एका गोष्टीमुळे प्रियांका चोप्रा सध्या सोशल मिडीयावर ट्रोल होत आहे. प्रियांकाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

मेहंदी, लग्न या फोटोजसोबतच उमेद भवनच्या बाहेर झालेल्या आतेषबाजीचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फटक्‍यांमुळे तिला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे. प्रियांकाने एका महिन्यापूर्वी “दिवाळीत फटके वाजवू नये’ आणि “माझ्या सारख्या अस्थमा असलेल्या लोकांना मदत करा’ अशा प्रकारचा व्हिडीओद्वारे सोशल मिडिया वरून प्रसारीत केला होता.

-Ads-

फटाके न वाजवण्याबाबत तिने केलेल्या आवाहनाचे तेंव्हा कौतुकही झाले होते. पण, स्वत:च्याच लग्नात इतक्‍या मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्याला प्राधान्य दिल्यामुळे ती अडचणीत आली. मुख्य म्हणजे फटाके वाजवल्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस जोधपूरमध्ये हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी वाढल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळ किती हा ढोंगीपणा, असंच म्हणत प्रियांकाचा जुना व्हिडिओ पोस्ट करत तिची ही चूक अनेकांनीच लक्षात आणून दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
5 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
2 :cry: Sad
17 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)