मोदींच्या गुजरातेत प्रियंका कडाडल्या

नुकताच सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेल्या प्रियंका गांधी यांची आज लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पहिलीवहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातेत झाली. यावेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला सविस्तर वृत्त : https://goo.gl/HfpVBH

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 12 March 2019

अहमदाबाद : नुकताच सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेल्या प्रियंका गांधी वढेरा यांची आज लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पहिलीवहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातेत झाली. यावेळी बोलताना प्रियंका गांधी वढेरा यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशामध्ये असहिष्णुता पसरवण्याचा आरोप मोदी सरकारवर लावताना त्या म्हणाल्या, “सत्ताधारी पक्षाकडून जनतेला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण केली गेली नसून भाजप देशामध्ये द्वेषाचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे.”

काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी वढेरा यांच्याकडे उत्तरप्रदेश सरचिटणीस पदाची धुरा सोपण्यात आल्यानंतर आजची गुजरातमधील गांधीनगर येथील सभा त्यांची पहिली सभा ठरली “देशामध्ये अराजकतेचे वातावरण असून देशातील महत्वाच्या सरकारी संस्था सत्ताधारी भाजपकडून उध्वस्त केल्या जात आहेत. तुमच्या-माझ्यासाठी या देशाचे रक्षण करणे आणि देशाला पुढे घेऊन जाणे हेच सर्वोच्च कर्तव्य आहे.” असं देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)