प्रियांका-निक घेणार घटस्फोट?

मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. परंतु, आता या दोघांबद्दल एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. प्रियांका आणि निक दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त चर्चेत आहे. मात्र या वृत्ताला कोणताही दुजोरा नाही.

अमेरिकेतील ‘ओके’ नावाच्या या मासिकामध्ये म्हटले आहे की, प्रियांका आणि निकमध्ये सध्या लहान-लहान गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघंही एकमेकांसोबत आनंदी नाहीत. निकच्या मते, त्यानं हे लग्न खूप घाईघाईत केलं आणि लग्नाच्यावेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की, प्रियांका खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकनं प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असं जोनस कुटुंबियांना वाटतं.

दरम्यान, निक-प्रियांका नुकतेच मायामीवरून सुट्टी एंजॉय करून परतले आहेत. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सेशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे या मासिकानं प्रसिद्ध केलेल्या या वृत्तात कितपत तथ्य आहे हे निक किंवा प्रियांकाच्या प्रतिक्रियेनंतरच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)