प्रियांका-किमचा फोटो व्हायरल 

मुंबई – बॉलिवूडमधील देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा विविध कारणांमुळे कायमच चर्चेत असतात. अशाच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन या अभिनेत्रींचा एकत्रित फोटो सध्या चर्चेसोबतच व्हायरल होत आहे.

या दोघी न्युयॉर्कमध्ये नुकत्याच नों टिफनी ऍण्ड कोजच्या ब्लू बूक कलेक्‍शनच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आल्या. या दोन्ही अभिनेत्री यावेळी प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामध्ये दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या दोघींचाही वावर पाहता या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रीण असल्याचा भास होत होता. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील प्रियांका-किमचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून या दोन्ही अभिनेत्रींनी यामध्ये एक खास पोझ दिली आहे. प्रियांकाने यावेळी पेस्टल रंगाचा बॅकलेस सिक्वेंस ड्रेस घातलेला होता. तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस किम झळकत आहे. तिने त्यासोबतच सिल्वर रंगाचे दागिनेही घातले होते. प्रियांकाने यावेळी केलेल्या गेटअपमुळे किमपेक्षा ती जास्त उठून दिसत आहे. दरम्यान, हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी या कार्यक्रमामध्ये प्रियांकासोबत उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)