प्रियांका चोप्राचे जेंव्हापासून निक जोनासबरोबर लग्न झाले, तेंव्हापासून तिच्यात अमूलाग्र बदल झाला आहे. मेट गालामध्ये जेंव्हा ती मागच्यावेळी गेली होती, तेंव्हाची प्रियांका आणि यंदाच्या मेट गालामध्ये गेलेली प्रियांका यांच्यात जमीन आस्मानचे अंतर आहे. यंदा मेट गालामध्ये रेड कार्पेटवर निकबरोबर आलेल्या प्रियांकाने इतका विचित्र मेक अप केला होता, ती ती आपली “देसी गर्ल”आहे, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. मेट गालामध्ये पीसी कॅम्प थीमच्या वेशभुषेत होती. सिल्व्हर गाऊनमध्ये ती अजिबात ओळखू येत नव्हती. तिने केलेली हेअर स्टाईलही तिला अजिबात शोभून दिसत नव्हती.
दुसरीकडे निकपण व्हाईट ड्रेसमध्ये आणि सिल्व्हर शूजमध्ये अगदी विचित्र दिसत होता. पण प्रियांकाच्या लुकवरून फॅन्सनी तिला प्रचंड ट्रोल केले. बऱ्याच जणांनी तिची तुलना “ऍलिस ऍन्ड वंडरलॅन्ड’मधील मॅड हॅटरशी केली. कोणी तिला डायन म्हणाले, तर कोणी काळी परी म्हणाले. कोणी विरप्पनच्या मिशांप्रमाणे तिची हेअरस्टाईल असल्याचे दाखवणारा एक कोलाज फोटोही शेअर केला. या असल्या ड्रेसमध्ये बड्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्रियांकानी स्वतःचे हसे करून घेतले आहे, हे मात्र नक्की.