निरव मोदी यांच्या अटकेबाबत प्रियंका गांधींची मिश्कील टिप्पणी 

संग्रहित छायाचित्र...

उत्तरप्रदेश : प्रियंका गांधी वढेरा यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला असून काँग्रेसतर्फे त्यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशचे सरचिटणीस पद देण्यात आले आहे. सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासूनच प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी तथा सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

अशातच प्रियंका गांधी यांनी आज भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरारी झालेल्या निरव मोदीला अटक झाल्याप्रकरणी मिश्कील टिप्पणी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कर्जबुडव्या निरव मोदी यास लंडन पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. निरव मोदीला करण्यात आलेल्या अटकेवरून भारतामध्ये जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी निरव मोदीला झालेल्या अटकेला आपल्या सरकारचे कूटनीतिक यश ठरवले आहे. दरम्यान याबाबत प्रियंका गांधी वढेरा यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणतात, “हे कसले यश? निरव मोदी ला देशातून बाहेर जाऊ कुणी दिलं होतं??”

तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी देखील निरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न म्हणजे निवडणुकांत पूर्वीची स्टंटबाजी असल्याचे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)