सत्ताधुंद भाजप नेत्यांवर कारवाई कधी? – प्रियांका गांधी

नवी दिल्ली – भाजपच्या काही सत्ताधुंद नेत्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करून दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी ट्विटरवर या संबंधात अलिकडेच काही घडलेल्या घटनांचा उल्लेख करून म्हटले आहे की एकाने बॅटने कर्मचाऱ्याला बेदम मारले, दुसऱ्याने टोल कर्मचाऱ्यांना काठीने बडवले, एकाने थेट गोळीबार केला. यात भाजपच्या खासदारांसह अन्य वरीष्ठ अधिकारी गुंतले आहेत. मोठ्या बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपने लोकांची सेवा करण्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे धोरण आखले आहे. अशा लोकांवर भाजपकडून कारवाई होण्याची शक्‍यता आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे आमदार चिरंजीव आकाश यांनी गेल्या 26 जून रोजी एका महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.अवधी बाकी आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूका घेण्यापेक्षा सरकार स्थापन करण्याचाच प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)