प्रियंका गांधी-वढेरांचे मिशन युपी आजपासून; लखनऊमध्ये रोड शो 

नवी दिल्ली – काँग्रेसची नवनियुक्त सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा आजपासून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. लखनऊमध्ये आज प्रियांका गांधी-वढेरा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया रोड शो करणार आहेत. प्रियंका गांधी-वढेरांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी असून ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मागील महिन्यात प्रियंका गांधी-वढेरा यांच्यावर उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी दिली आहे. तर पश्चिमेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)