काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस ‘प्रियंका गांधी’ सोशल मीडियावर सक्रिय

‘ट्विटर’वर अधिकृत अकाउंट उघडले

पुणे : काँग्रेसने लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रीय करून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी दिली. त्यानंतर आता नवनियुक्त सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा यांची ट्विटरवर एन्ट्री झाली आहे.

याबाबत काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबदल माहिती दिली असून सर्वांनी प्रियंका गांधी यांच्या ट्विटर अकाउंटला फाॅलो करा असे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून @priyankagandhi हे त्यांचे ऑफिशियल ट्विटर अकाउंट असल्याचे सांगितले आहे. प्रियंका गांधी यांच्या अकाउंटवरून अद्याप कोणतेही ट्विट करण्यात आलेले नाही. प्रियंका गांधी यांचे हे ट्विटर अकाउंट वेरिफाइड असून  काही तासातच जवळजवळ 67 हजार पेक्षा अधिक जणांनी त्यांना आतापर्यंत फॉलो केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षाकडून सोशल मिडीया यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची देखील ट्विटरवर एन्ट्री झाली आहे. काही वर्षांत राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून आपली भुमिका मांडणे आणि प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)