प्रियंका गांधी-वढेरांनी लाल बहादूर शास्त्री यांचा अपमान केला – स्मृती इराणी 

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांच्यावर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा अपमान करण्याचा आरोप केला आहे. स्मृती इराणी यांनी एका व्हिडीओ ट्विट करत हिंदीतून प्रियंका गांधी-वढेरा यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या व्हिडिओत प्रियांका गांधी आपल्या गळ्यातील हार काढत हातात घेते आणि तोच हार लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अर्पण करते.

दरम्यान, प्रियंका गांधी-वढेरा तीन दिवसीय उत्तरप्रदेश दौऱ्यावर होत्या. यावेळी रामनगर येथील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला आहे. प्रियांका गांधी-वढेरा या तेथून गेल्यानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे गंगाजलने शुद्धीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)