…म्हणून नाही लढविणार प्रियंका गांधी लोकसभा निवडणुका

नवी दिल्ली: प्रियंका गांधी यावेळेस लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका  गांधी निवडणुकीऐवजी पक्ष प्रचारात लक्ष केंद्रित करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी पक्षाच्या आघाडीच्या नेतृत्वासही माहिती दिली आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना प्रियंका गांधी वढेरा यांना त्यांच्या भाऊ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मदत करू इच्छित आहे.

प्रियंका गांधींनी या वर्षी जानेवारी महिन्यात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना  उत्तर प्रदेशचे प्रभारी व सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिल्ली. मंगळवारी त्यांनी गांधीनगर, गुजरात मधील त्यांच्या पहिल्या सभेला संबोधित केले. या काळात त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणांवर हल्ला केला.

देशामध्ये असहिष्णुता पसरवण्याचा आरोप मोदी सरकारवर लावताना त्या म्हणाल्या, “सत्ताधारी पक्षाकडून जनतेला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण केली गेली नसून भाजप देशामध्ये द्वेषाचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे.”

काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी वढेरा यांच्याकडे उत्तरप्रदेश सरचिटणीस पदाची धुरा सोपण्यात आल्यानंतर आजची गुजरातमधील गांधीनगर येथील सभा त्यांची पहिली सभा ठरली “देशामध्ये अराजकतेचे वातावरण असून देशातील महत्वाच्या सरकारी संस्था सत्ताधारी भाजपकडून उध्वस्त केल्या जात आहेत. तुमच्या-माझ्यासाठी या देशाचे रक्षण करणे आणि देशाला पुढे घेऊन जाणे हेच सर्वोच्च कर्तव्य आहे.” असं देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)