सचिव कुमार आशिष यांना प्रियंका गांधींनी का केले निलंबित ?

संग्रहित छायाचित्र....

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आले. कॉंग्रेसमध्ये पक्षाचे सरचिटणीस म्हणून प्रियांका गांधी सुद्धा प्रत्येक  पाऊल विचार करून उचलतांना दिसून येत आहे.

यातच नियुक्तीनंतर एका दिवसामध्ये त्यांनी सचिव कुमार आशिष यांना निलंबित केले. वास्तविक पाहता, बिहारमधील पेपर लीकच्या जुन्या घटनेमध्ये सचिव कुमार आशिष यांच्या सहभागामुळे वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नियुक्ती रद्द करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये मराठी चेहरा असलेले कोल्हापूरचे बाजीराव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या बाजीराव खाडे यांना कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व) सचिव पदाची जबाबदारी दिली आहे.बाजीराव खाडे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ गावचे रहिवाशी आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)