प्रियांका गांधी पावसाळ्यातील बेडक्याप्रमाणे : गजेंद्र चौहान

मुंबई – प्रसिद्ध महाभारत मालिकेत युधिष्ठिरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गजेंद्र चौहान आता भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. २००४ मध्ये भाजपशी जोडल्या गेलेल्या चौहान यांना २०१५ मध्ये FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. आता ते भारतीय जनता पार्टीकडून मुंबईतून लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत एक वृत्त वाहिनीशी बोलताना गजेंद्र म्हणाले की,‘मी कोणतंही विधान करू शकत नाही. पण जर पक्षाने मला निवडणुक लढवण्याची परवानगी दिली तर मी नक्कीच उभा राहीन.’ तसेच लोकसभा निवडणुकांच्याआधी काँग्रेसची कमान प्रियांका गांधींच्या हातात गेल्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबद्दल बोलताना गजेंद्र म्हणाले की, ‘प्रियांका गांधी त्या लोकांप्रमाणे आहे जी निवडणुकांच्या पावसात, पावसाळ्यातील बेडक्याप्रमाणे बाहेर येते. जर त्यांना देशातील जनतेची काळजी असती तर अनेक वर्षांपूर्वीच त्यांनी स्वतःला देशसेवेत वाहून घेतले असते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)