प्रियांका पुर्ण सक्षम; त्यांच्या राजकारण प्रवेशाने भाजप घाबरली : राहुल गांधी यांची प्रतिक्रीया

अमेठी: आपल्या भगिनी प्रियांका या पुर्ण सक्षम आहेत त्यांच्या राजकारण प्रवेशाने आपल्याला आनंद झाला असून त्या आता आपल्याला लोकसभा निवडणुकीत चांगली मदत करतील अशी अपेक्षा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाने भाजपा घाबरली अशी प्रतिक्रीयाही राहुल गांधी यांनी दिली आहे. त्यांना आपण उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी केवळ दोन महिन्यांकरीत नेमलेले नाही.

प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे हे उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि या राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देतील असेही राहुल गांधी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी हे दोन दिवसांच्या अमेठी भेटीसाठी आले आहेत त्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते पत्रकारांशी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांनी कॉंग्रेसला बाजुला ठेऊन आघाडी केली आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की या दोन पक्षांनी भाजपला विरोध करण्यासाठी ही आघाडी केली आहे. भाजप हा आमचा समान शत्रु आहे. मी समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षाला विरोध करीत नाही त्यांच्या विषयी आमच्या मनात शत्रुत्व नाही. त्यांच्याशी एकत्र काम करण्याची आमची तयारी आहे. पण उत्तरप्रदेशात आम्हाला आमच्याही पक्षाची विचारसरणी पुढे न्यावी लागेल असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)