देसी गर्ल प्रियांकाला ‘या’ गोष्टीची वाटते सर्वाधिक भीती

बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारी देसी गर्ल अर्थात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या सर्वात मोठ्या ‘भीतीचा’ खुलासा केला आहे. क्वांटिको या मालिकेसह पाश्चिमात्य प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या प्रियंकाला ‘अपयशाची’ सर्वाधिक भीती वाटते असा खुलासा खुद्द प्रियंकाने केला आहे.
प्रियंकाने आपल्या भीती बद्दल बोलताना म्हंटले की “मला अपयशांचा तिटकारा आहे, मी जर कधी एखाद्या गोष्टीमध्ये अपयशी झाले तर मी स्वतः सोबत वेळ घालवते. माझ्या आईला माझी सवय माहित असल्याने ती देखील अशा प्रसंगी मला स्वतः सोबत वेळ घालवण्यासाठी निवांत वेळ देते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)