प्रियांका आणि निक लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत?

अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास व देशी गर्ल प्रियांका चोप्रा यांच्या ‘अफेयरच्या’ चर्चा रंगत असतानाच एका प्रसिद्ध मासिकाने प्रियांका आणि निक लवकरच विवाह बंधनात अडणार असल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार प्रियांका व निक जुलै महिन्याच्या शेवटास किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस ‘इगेजमेंट’ करणार आहेत. निक प्रियांका व तिच्या आई सोबत मुंबईमधील एका हॉटेल मध्ये डिनरसाठी आल्याने त्याचा भारतदौरा देखील प्रियांकाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठीच होता कि काय असे तर्क लावले जात आहेत.
प्रियांका चोप्रा व तिच्या कुटुंबीयांसोबत निक जोनास
दरम्यान प्रियांका चोप्राच्या आईने मात्र निक व प्रियांकाच्या ‘इंगेजमेंट’ च्या बातम्या साफ खोट्या असल्याचे म्हणले असून प्रियांका निक सोबत लग्नाच्या विचारात नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)