ईशा अंबानीच्या संगीत पार्टीत परफॉर्म करणार प्रियांका चोप्रा? 

बॉलीवूडमधील रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा-निक जोनस यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. भारतात प्रियांकासोबतच आणखी एका लग्न सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. ती म्हणजे ईशा अंबानीची. या लग्नातील संगीत पार्टीत चक्‍क प्रियांका चोप्रा परफॉर्म करणार असल्याचे समजते.

सध्या प्रियांका आणि निक जोनस हे त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यातच डिसेंबर महिन्यात ईशा अंबानी-आनंद पीरामल यांच्या संगीत सोहळ्यात प्रियांका परफॉर्म करण्याची तयारी करत आहे. तत्पुर्वी, इटली येथे लेक कोमोत ईशा-आनंद यांच्या साखरपुड्याची जग्गी पार्टी झाली होती. आता संगीत सोहळा रंगतदार होणार असून यात बॉलिवुडमधील मोठमोठ्या हस्तिया सहभागी होणार आहेत.

-Ads-

संगीत सेरिमनीत अनेक परफॉर्मेंस होणार असून यापैकी एक परफॉर्म प्रियांका चोप्राचाही असणार आहे. दरम्यान, ईशा-आनंद यांचा विवाह 12 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. अद्याप लग्नाबाबत जास्त माहिती समजू शकली आहे. दुसरीकडे प्रियांकाही लवकरच जोधपुर येथे निक जोनससोबत विवाह बंधनात अडकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
112 :thumbsup: Thumbs up
14 :heart: Love
3 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
13 :blush: Great
1 :cry: Sad
7 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)