प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर…

पुणे – ‘मिस वर्ल्ड 2000’ ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. प्रियांका चोप्रा हिच्या नावाचा समावेश आता यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत झाला आहे.

प्रियांका आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत तिच्यासोबत ऑपरा विनफ्रे, बियॉन्से, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.

दरम्यान, लग्नानंतर आपले काम आणि निक जोनासला वेळ देण्यात प्रियांका चोप्राची खूपच धावपळ उडाली. हॉलिवूडमध्ये काही काळ काम केल्यानंतर आता “स्काय इज पिंक’मधून कमबॅक करते आहे. लग्नानंतर प्रियांका स्वाभाविकपणे बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडला अधिक महत्व देणार असे तिच्या फॅन्सला वाटायला लागले होते.

प्रियांकाकडे सध्या बरेच काम आहे आणि आता प्रियांकाने बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा साईन केला आहे. या नवीन सिनेमाचे काम लवकरच सुरू होणार आहे. “स्काय इज पिंक’चे डायरेक्‍शन सोनाली बॉस करते आहे. प्रियंका चोप्राच्या बरोबर फरहान अख्तर आणि झायरा वसीम हे देखील यामध्ये असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)