प्रियांकाने ‘भारत’ सोडण्यामागे हॉलीवूडचे कनेक्शन

प्रियांका चोप्राने सलमान खानबरोबरचा “भारत’ सोडण्याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आहे. अगदी ऐनवेळी तिच्याकडून झालेल्या इतक्याा अनप्रोफेशनल वर्तनावरून तिच्यावर टीकाही व्हायला लागली आहे. आता तिच्या जागेवर कतरिनाची निवड झाली आणि “भारत’ची संभाव्य अडचण दूर झाली. सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र दिसणार ही एक जमेची बाजू आहे. मात्र, पीसीने नकार देण्यामागचे निश्चित कारण अद्याप गुलदस्त्यातच राहिले होते.

प्रियांकाने निक जोनाससाठी “भारत’ सोडला असे काही जण म्हणत आहेत. निकबरोबर गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर प्रियांकाला लगेचच लग्न करण्याची घाई झाली असावी, म्हणूनच तिने सिनेमाच्या शेड्युलमध्ये न अडकण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, त्यामध्ये खरे तर काही दम नाही. प्रियांकाने या महत्त्वाच्या सिनेमाला नकार देण्यामागे एक वेगळेच कारण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रियांकाने दुसऱ्या एखाद्या बड्या प्रोजेक्टसाठीच “भारत’ला नकार दिल्याचे तिच्या निकटवर्तीयांचे म्हणणे होते. खरे कारण तेच आहे. प्रियांकाने हॉलिवूडमधील सिनेमे कमी केले आहेत, असे काही महिन्यांपूर्वी समजले होते. मात्र, अगोदरच साईन केलेल्या सिनेमांच्या कामासाठी तिला पुन्हा उपलब्ध राहावे लागले आहे. हॉलिवूड अॅॅक्टर ख्रिस प्रॅटबरोबर “काऊबॉय निन्जा विकींग’मध्ये काम करण्याचे प्रियांकाने मान्य केले आहे. या सिनेमात ती लीड रोलमध्ये दिसणार आहे.

प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. “क्वांकटिगो’ आणि “बेवॉच’ व्यतिरिक्ता किड लाईक जॅकमध्येही ती दिसली होती. तिच्या या टीव्ही शो आणि हॉलिवूडपटांना प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली होती. हॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झालेल्या प्रियांकाने बॉलिवूडचे नावही मोठे केले आहे. 2016 मध्ये तिने “जय गंगाजल’ केला होता. त्यानंतर तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये बघितले गेले नव्हते. ती संधी “भारत’च्या निमित्ताने मिळाली होती. तिने “भारत’ला नकार देऊन काहीही अनप्रोफेशनलपणा दाखवलेला नाही. उलट आपला शब्द पाळून तिने प्रोफेशनल अॅॅप्रोचच सिद्ध केला आहे. सलमानबरोबर तिला परत कधीही सिनेमा करता येऊ शकतो. पण हॉलिवूडच्या लीड रोलची संधी पुन्हा मिळू शकली नसती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)