प्रियंका चोप्रा आणि निक जोनास विवाहबद्ध 

जोधपूर: हिंदी चित्रपटातील देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकेतील गायक निक जोनास आज संध्याकाळी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्‍चन पद्धतीने विवाहबद्ध झाले. ख्रिश्‍चन रितीरिवाजाप्रमाणे धर्मगुरुंसमोर या दोघांनी एकमेकांना जीवनसाथीदार म्हणून स्वीकारल्याचे मान्य केले. प्रियंका आणि निक आता हिंदू पद्धतीनेही विवाहबद्ध होणार असल्याचे या समारंभाला उपस्थित असलेल्या निकटवर्तीयांच्या सूत्रांनी सांगितले.

या समारंभाच्या पूर्वीचे रितीरिवाज शुक्रवारपासूनच सुरू झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांच्या विवाहानिमित्त मेंदी आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रियंकाने स्वतः नृत्यात सहभाग घेतला होता. तर निकनेही आपल्या प्रिय पत्नीसाठी खास गीत गायले होते. या दोघांनीही मिळून सामुहिक नृत्यही केले होते. या समारंभातील आनंदोत्सवाचा भाग म्हणून उम्मेद भवन पॅलेसच्या आवारामध्ये मोठी आतषबाजीही करण्यात आली होती.

-Ads-

या विवाह समारंभाला नीता अंबानी, अनंत आणि इशा अंबानी यांची उपस्थिती लक्षणीय होती. याशिवाय बॉलिवूडमधील गणेश हेगडे, संदीप खोसला, मिकी कॉन्ट्रॅक्‍टर, अर्पिता खान, ब्रिटीश-भारतीय टिव्ही कलाकार जस्मीन वालिया, हॉलिवूडची ऍक्‍ट्रेस एलिझाबेथ चेंबर्स आदी मान्यवर उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)