मुंबई – प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बाधून प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
.@INCIndia च्या राष्ट्रीय प्रवक्त्या सौ. @priyankac19 जी यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/H6L9amvDCq
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 19, 2019
मला मुंबईकरांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मला मुंबईकरांसाठी काम करायचे आहे. तसेच मला महिलांचा मुद्दा घेऊन आवाज उठवायचा आहे. मी महिला सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करेन. त्या दृष्टीकोनातून मी विचार करुन शिवसेनेत प्रवेश घेतला”. देशात शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले.
प्रियंका चतुर्वेदीचा अखेर काँग्रेसला राम राम
दरम्यान, प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान मिळत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला पाठवला होता. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान हा काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.