प्रियांका आणि निकचा विवाह म्हणजे धोका!

जोधपूरमध्ये 1 डिसेंबरला ख्रिश्‍चन पद्धतीने आणि 2 डिसेंबरला प्रियांका आणि निक जोनासचे हिंदू पद्धतीने लग्न लागले. या दोघांच्या विवाह समारंभाची आवरा आवरीही झाली आणि आता हे दोघेजण अमेरिकेला रवानाही होण्याच्या तयारीत आहेत. पण अमेरिकेतल्या एका मॅगझीनने या विवाह समारंभावर मोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. या मॅगझीनमध्ये प्रियांकाचा उल्लेख “ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ अशी करण्यात आली होती.

या शिवाय “निक आणि प्रियांकामधील प्रेम खरे आहे का ?’ अशाच शिर्षकाने जोधपूरमधील विवाहाच्या सत्यतेबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. प्रियांकाने अमेरिकेचा नागरिक असलेल्या निकला खोटेपणाने आपल्या प्रेमात पाडले आणि त्याच्या बरोबर विवाह केल्याचा दावा या लेखात केला गेला होता.

-Ads-

हे लग्न म्हणजे फसवणूक, धोका असल्याची टीकाही केली. यामुळे बॉलिवूडसह हॉलिवूडमधील कलाकारही चांगलेच भडकले. निकच्या कुटुंबीयांनीही या मॅगझीनवर सडकून टीका केली. हे प्रकरण अचानक वाढायला लागल्यावर या मॅगझीनने लगेच माफी मागून सामोपचाराची भूमिका घेतली. या लेखाला आपल्या वेब पोर्टलवरून हटवत आहोत, अशी घोषणाही या मॅगझीनने केली. या विषयावर अधिक चर्चा न करण्याचा निर्णय सर्व संबंधितांनी घेतल्याने विषय मिटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)