प्रियांका आणि निकचे लग्न होणार दोनवेळा 

बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर – दीपिका आणि निक – प्रियांका या दोन जोड्यांच्या विवाहाबाबत खूप उत्सुकता आहे. रणवीर – दीपिकाच्या लग्नानंतर काही दिवसातच निक- प्रियांकाचाही विवाह होणार आहे. पण निक आणि प्रियांकाच्या विवाहाबाबत एक खासियत आहे. ती म्हणजे हे दोघेजण एकदा नव्हे तर दोन वेळेला विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. एकदा हिंदू पद्धतीने तर दुसऱ्यांदा ख्रिश्‍चन पद्धतीने हे दोघे लग्न करणार आहेत.

दोघांनी एकमेकांच्या धर्माबाबत आदर व्यक्‍त केला आहे. त्यामुळे दोन्ही धर्माच्या रितीरिवाजांनुसार दोनवेळेस लग्न केले जाणार आहे. हिंदू पद्धतीने 2 डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये यांचा विवाह होणार आहे. या शाही विवाह सोहळ्याला सुमारे 1500 ते 2000 लोक हजेरी लावणार आहेत आणि हा समारंभ तीन दिवस चालणार आहे. 30 नोव्हेंबरला निक आणि प्रियांकाच्या जोडीचा मेंदीचा समारंभ होणार आहे.

यावेळी होणाऱ्या संगीतमय कार्यक्रमात स्वतः निक प्रियांकासाठी गाणे म्हणणार आहे, तर प्रियांकाही आपली नाचण्याची हौस भागवून घेणार आहे, असे ऐकायला मिळाले आहे. निक हॉलिवूडमध्ये संगीतकार असल्याने त्याच्या गाण्यांची खास यादीच प्रियांकाने तयार करून घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)