प्रिया बापटने का चक दे इंडियाला नकारला ?

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रिया बापटने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. काकस्पर्श, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, वजनदार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात प्रियाने लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. हिंदी, मराठी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्ये देखील तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान प्राप्त केले आहे. मात्र चक दे इंडिया या चित्रपटात प्रियाने का काम केले नाही याविषयी तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

प्रिया बापट हिने मुलाखती दरम्यान सांगितले कि, ‘ मला चक दे इंडिया या चित्रपटाची देखील ऑफर आली होती. मात्र ग्रॅज्युएशनचे वर्षं असल्याने मी चक दे इंडियाला नकार दिला. त्या काळात माझ्यासाठी माझा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. चक दे ही खरंच मोठी ऑफर होती. मात्र मी कसलाही विचार न करता, एकाच फटक्यात नाही म्हंटल होतं.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)