खासगी इंग्लिश शाळा आज बंद

आयईएसएचे आंदोलन : ऐन परीक्षेपुढे “बंद’मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

पिंपरी – इंडिपेंडेन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (आयईएसए) वतीने प्रलंबित विविध मागण्यासाठी सोमवारी (दि. 25) खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील साडेचार हजार शाळा सहभागी होणार असल्याचे, स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी केला आहे. मात्र, सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने या बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयईएसएने असोसिएशन पार्टनर नॅशनल इंडिपेंडेन्ट स्कूल अलायन्सच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी हा बंद ठेवला आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून काही दिवसात दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये शाळा एक दिवस बंद ठेवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

या आहेत मागण्या
सिंग म्हणाले, आमच्या मागण्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शाळांच्या असून अनेक दिवसांपासून त्या प्रलंबित आहेत. असोसिएशनने नोव्हेंबर मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण व कठोर प्रक्रिया मागे घ्यावी. तसेच, 2012 ते 2019 पर्यंत आरटीई 25 टक्के प्रवेशाची थकीत फी परतावा तातडीने द्यावा. राज्यातील सर्व शाळांसाठी “शाळा संरक्षण कायदा’ करावा. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी. शालेय विद्यार्थी वाहतूकसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्‍त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपवण्यात यावी. पाल्यांच्या शुल्काची पूर्तता न करणाऱ्या पालकांवर शाळेने कोणती कारवाई केली पाहिजे त्याची नियमावली लागू करावी. सरकारने आरटीई अंतर्गत मोफत पुस्तके, पिशवी, गणवेश आणि इतर सामग्री उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घ्यावी, अशा विविध मागण्यांसाठी एक दिवस स्कूल बंद आंदोलन करण्यात आहे. तसेच, या बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)