प्रिती झिंटा पुन्हा येते आहे

गेल्या पाच वर्षांपासून रूपेरी पडद्यापासून दूर असलेली प्रिती झिंटा आता लवकरच पुनरागमन करणार आहे. तिने आपल्या “भय्याजी सुपरहिट’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये प्रिती हातात बंदूक घेतलेल्या रोलमध्ये दिसते आहे.

बऱ्याच काळापासून लाईम लाईटपासून दूर असलेल्या प्रिती झिंटाला या अवतारामध्ये बघितल्यावर तिच्या चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्‍काच बसला असणार. आपल्या रोलबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केल्यानंतर प्रितीने प्रेक्षकांनाच या रोलबाबत काय कल्पना असतील, याची चाचपणी केली आहे. हे पोस्टर बघितल्यावर “हे काय आहे, असे वाटते?’ असा सवालच तिने ट्विटरवर विचारला आणि ही “भय्याजी सुपरहिट’मधील सपना दुबे आहे, असे उत्तरही तिने स्वतःच देऊन टाकले आहे. लाल साडी नेसलेली आणि हातात बंदूक घेतलेली प्रिती एकदम हटके अंदाजात दिसते आहे. तिला प्रेक्षकांनी आतापर्यंत कधीही अॅक्‍शन रोलमध्ये बघितलेले नाही. त्यामुळेच तिच्या या गेटअपबाबत चर्चा व्हायला लागली आहे. 19 ऑक्‍टोबरला रिलीज होणाऱ्या “भय्याजी सुपरहिट’मध्ये सनी देओल, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, अमिषा पटेल आणि मुकुल देवही असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी 2013 मध्ये तिचा “इश्‍क इन पॅरिस’ रिलीज झाला होता. त्यामध्ये तिने अॅक्‍टिंग बरोबर निर्माती आणि लेखिकेची जबाबदारीही सांभाळली होती. हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर सपशेल आपटला होता. त्यामुळे निर्माती किंवा लेखिकेचा तिचा प्रवास सुरू झाल्याबरोबर लगेचच थांबलाही होता.

जेन गुडइनफबरोबर 2016 मध्ये लग्न झाल्यापासूनच भारत आणि अमेरिकेच्या तिच्या सारख्या वाऱ्या सुरू होत्या. या पाच वर्षात ती काय करते आहे, याबाबत कोणताही थांगपत्ता तिने लागू दिला नव्हता. ती जेन गुडइनबरोबर न्यूयॉर्कमध्येच राहत होती, इतकीच माहिती मिळाली होती. अलीकडेच तिने ट्विटरवर आपल्या नवऱ्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आणि आपल्या नवऱ्याची सगळ्यांना ओळख करून दिली. “माय सनशाईन, पती परमेश्‍वर’ असे तिने फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे. जेन कॅलिफोर्नियामध्ये फायनान्शियल अॅनालिस्ट आहे. आता “भय्याजी…’ रिलीज झाल्यावर प्रिती पुढे काय काय करणार आहे, हे समजेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)