पृथ्वी शाॅची दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच

ए़डिलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एडिलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला पृथ्वी शाॅ दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील खेळण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शाॅ च्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. बाॅक्सिंग डे टेस्ट म्हणजेच मालिकेतील तिसऱ्या कसोटीपर्यंत शाॅ तंदरूस्त होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना शास्त्री म्हणाले की, पृथ्वी शाॅ दुखापती मधून सावरत असून तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. तसेच मेलबर्न येथे होणाऱ्या 26 डिसेंबर ते 31 जानेवारी रोजीच्या बाॅक्सिंग डे सामन्यात पूनरागमन करेल.

19 वर्षीय पृथ्वी शाॅला ऑस्ट्रेलिया एकादशविरूध्द सिडनी येथे झालेल्या सराव सामन्यात झेल घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यास पृथ्वी शाॅ ला मुकावे लागले होते.

भारतीय संघास मोठा धक्का, पहिल्या कसोटीतून पृथ्वी शाॅ बाहेर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)