भारतीय संघास मोठा धक्का, पहिल्या कसोटीतून पृथ्वी शाॅ बाहेर

सिडनी – आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेस सुरूवात होण्यापूर्वीस भारतीय संघास एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान होऊ शकते. भारताचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शाॅ सराव सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आहे.

सिडनीमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान सीमारेषेजवळ झेल टिपताना पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. यानंतर पृथ्वीला टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने उचलून ड्रेसिंग रुममध्ये नेले. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 6 डिसेंबरपासून भारत वि. आॅस्ट्रेलिया पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे.

-Ads-

ही दुखापत गंभीर असल्याने पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत खेळणार नाही असे बीसीसीआयने ट्विट करुन सांगितले आहे.

दरम्यान, पृथ्वी शॉने कसोटी सराव सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 69 चेंडूत 66 धावांची  खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित समजला जात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)