शिर्डीत साईबाबांच्या चरणी पंकज शॉ

शिर्डी - येथील साईबाबांच्या चरणी नवसपूर्ती करण्यासाठी आलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शाॅचे वडील पंकज शाॅ यांचा सत्कार करण्यात आला.

संघात समावेशाचा नवस केला शाॅ यांनी आज पूर्ण

शिर्डी- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची निवड व्हावी यासाठी साईबाबांच्या चरणी मनोकामना केली होती. बाबांच्या आशीर्वादाने ती पूर्ण झाली. त्याची नवसपूर्ती करण्यासाठी साईंच्या दरबारी आल्याचे क्रिकेटपटू पृथ्वी शॉचे वडील पंकज शॉ यांनी शिर्डीत सांगितले.

-Ads-

दरम्यान गुरुवारी राजकोट येथे सुरु झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वीचे वडील पंकज शॉ यांनी शुक्रवारी (दि.5) रोजी मध्यान्ह आरतीपूर्वी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने नलिनी हावरे यांच्या हस्ते शाल आणि उदी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर, मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप, वाल्मिक उदावंत, रमेश त्रिभूवन, आकाश त्रिभूवन, गणेश त्रिभूवन आदी उपस्थित होते.

यावेळी शॉ म्हणाले, मुलगा पृथ्वीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी निवड होण्यासाठी बाबांना साकडे घातले होते. साईबाबांच्या आशीर्वादाने त्याची निवड झाली. पृथ्वीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याचे सांगितले. त्याला गुरु प्रशांत शेट्टी आणि चंद्रकांत भाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. पृथ्वी चार वर्षाचा असताना त्याच्या आईचे अकाली निधन झाले. तेंव्हापासून त्याचे आई आणि वडिल म्हणून पालन पोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आली.

क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी मुलाच्या भवितव्यासाठी वेळेअभावी व्यवसायाकडे दुर्लक्ष करावे लागल्याची खंत व्यक्‍त केली. आतापर्यंत पृथ्वीने 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील क्रिकेट खेळला आहे. त्याने 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत भारताला विश्वकप जिंकून दिला आहे, असेही शॉ यांनी सांगितले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)