मालदीवचे माजी अध्यक्ष नशीद यांचा तुरुंगवास स्थगित 

माले – मालदीवएचे माजी अध्यक्ष नशीद यांना फर्मावण्यात आलेली 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकार, पोलीस आणि तुरुंगाधिकारी यांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. माजी अध्यक्ष नशीद हे गेली दोन वर्षे अज्ञातवासात होते. आता ते पुन्हा मालदीवमध्ये परत येण्याच्या दोन दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा त्यांची शिक्षा स्थगित केल्याचा आदेश आला आहे.

नशीद मालदीवमध्ये परत आल्यानंतर त्यांची अटक रोखण्यासाठी सत्तेवर येणाऱ्या सरकारची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. नशीद यांच्या पक्षाच्या उमेदवाराने अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना निवडणुकीत पराभूत केले आहे. नुकतीच सत्ता गमावलेले अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांच्या सरकारने नशीद आणि अन्य अनेक राजकारण्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यांच्यावर चालवलेल्या खटल्यांमध्ये मोठी अनियमितता असल्याची टीका झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)