नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी बंगालमध्ये कारागृह फोडण्याचा कट

जमशेदपुर: पश्‍चिम बंगाल मधील पश्‍चिम विरभूम जिल्ह्यात चैबासा येथील विभागीय कारागृह फोडण्याचा कट उघडकीला आला आहे. तेथील नक्षलवाद्यांची सुटका करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यात या कारागृहातील तीन सुरक्षा गार्डसचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या चौथ्या इसमाचे नाव रामा पांडे असून तो नक्षलवाद्यांचा फायनान्सर म्हणून कार्यरत होता. तसेच तो स्वत: एक कामगार नेताही आहे. 

नक्षलवाद्यांचा एक प्रमुख म्होरक्‍या संदीप उर्फ मोतिलाल सोरन, जयमसिंह चरड, रामेश्‍वर कुनकल, मार्कंडेय सिंह कुंतिया, देवकुमार बिरूली, नला भिक्षापती, राजेश तुडु या नक्षलवाद्यांना कारागृहातून सोडवून नेण्यासाठी तुरूंग फोडण्याचा प्रयत्न योजला गेला पण तो वेळीच उघडकीला आला. दुर्गापुजेच्या धामधुमीच्या काळाची संधी साधून ही तरूंग फोडी केली जाणार होती. त्यासाठी काही कारागृह गार्डसनाही फितुर करून घेण्यात आले होते व त्यांना मोठ्या रकमांचे अमिष दाखवण्यात आले होते. नक्षलवाद्यांना कोर्टाच्या तारखेसाठी कोर्टात नेले जात असताना त्याचवेळी कारागृहाच्या बाहेर पोलिसांवर हल्ला करून नक्षलवाद्यांना पळवून नेले जाणार होते. या योजनेसाठी पैसा पुरवण्याचे काम संदीप उर्फ मोतिलाल सोरेन हा करीत होता पण तोच पोलिसांच्या तावडीत सापडल्याने या योजनेचे फज्जा उडाला आहे. या राज्यात 9 डिसेंबर 2014 रोजी सुरक्षा जवानांवर मिरची पावडर टाकून नक्षलवाद्यांना पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)