यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने समाजकारणास प्राधान्य

मसूर – स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची पाठराखण करुन त्यांनी दिलेल्या शिकवणूकीतून समाजकारणास नेहमीच प्राधान्य देण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. अंतवडी, ता. कराड येथे रस्त्याचे उद्‌घाटन व कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, या मतदार संघामध्ये सर्व गावांना समान न्यायाने निधी देवून चौफेर विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. सध्या भाजप शिवसेना सरकारमुळे अधिकचा निधी देण्यास टाळाटाळ होत आहे. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब या विभागाचे प्रतीनिधी होते. त्यावेळी त्यांनी 20 वर्षे प्लॅनींग योजनेमध्ये शहापूर, रिसवड, अंतवडी या रस्त्याचा समावेश केला होता. या रस्त्यामुळे गावाला विशेष महत्व आले आहे. त्यानंतर आता या रस्त्यासाठी दर्जोन्नती करण्यास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध केला. त्या माध्यमातून रस्त्याच्या रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे दळणवळणाची चांगली सोय निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गावातील शहीद महादेव निकम हे कारगील युध्दामध्ये शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण या गावातील तरुण मंडळांनी व ग्रामस्थांनी चांगल्या पध्दतीने केले आहे. तसेच या गावाला कुस्तीची चांगली परंपरा आहे. यामुळे या गावाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आभार सुरज शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास दाजी पवार, बाळासाहेब सुर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण, सुधाकर रामुगडे, संदिप काटे, माणिकराव पाटील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)