सत्तेत आल्यास महिला आरक्षणाला प्राधान्याने मंजुरी : राहुल गांधींची ग्वाही 

कोची : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज “२०१९मध्ये सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयकाला प्राधान्याने मंजुरी देऊ” अशी ग्वाही दिली आहे. बूथ लेव्हल कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांना एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून महिलांना जास्त प्रमाणामध्ये उमेदवारी मिळण्याची गरज असल्याची सूचना करण्यात आली होती.

कार्यकर्त्याच्या या मागणीबाबत बोलताना राहुल म्हणाले, “२०१९ लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर आम्ही सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयक प्राधान्याने मंजूर करून घेऊ. काँग्रेसला जास्तीत जास्त महिलांना सत्तास्थानी पाहायचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, महिलांना लोकसभा आणि विधिमंडळामध्ये ३३% आरक्षण देण्याचे विधेयक बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)