“राशी’च्या बनावट कापूस बियाणे विक्री केंद्रावर छापा 

प्रातिनिधिक छायाचित्र

नेवासे  – पावसाने हजेरी लावण्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून राशी या कापूस बियाणाला मोठी मागणी वाढत आहे. त्याचा फायदा घेवून राशी कंपनीच्या नावावर बनावट बियाणे विक्री होत असल्याच्या माहितीवरून आज कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील कुकाणा येथील एका विक्री केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात 5 पॉकेटे आर.सी.एच. 659 राशी कंपनीच्या नावाचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले.

कुकाणे येथे एका दुकानातून राशीचे बनावट कापसाचे बियाणे विकले जात होते. शेवगाव तालुक्‍यातील दहीगाव ने येथील काशीद (पूर्ण नाव माहीत नाही) या शेतकऱ्याला शंका आल्यावर पिशवीवरील बारकोड पाहिला. राशी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मसेज पाठविला. तेव्हा राशी कंपनीने हा कोड कोणत्या ठिकाणाहून पाठविला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कुकाणा येथील जेऊर चौकातील कृषी केंद्रावर छापा टाकून 5 पॉकेट आर.सी.एच. 659 राशी वान जप्त केले. तसेच हा दुकानदार हे बियाणे विना पावतीची विक्री करत असल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दुकानदारांवरील कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माहिती अधिकारी राजेश जानकर यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना दिली आहे.

पावसाळा सुरू होऊन तब्बल महिना उलटत आला असून ठराविक ठिकाणी सध्या पाऊस होत असल्याने दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांनी जमिनी मशागती करून पावसाची वाट पाहत होते. मागील 3-4 दिवसांपूर्वी नेवासे तालुक्‍यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात केली. तालुक्‍यातील कृषी केंद्र दुकानावर बियाणे खरेदीसाठी गर्दी करत अनेक कपाशी बियाणे खरेदी होते आहे. मात्र तालुक्‍यात व जिल्ह्यात राशी वाणाचे बनावट कंपनीचे बियाणे राजरोस विक्री होत असून हे बियाणे राशी कंपनीने वितरकांना विक्रीसाठी दिले नसल्याने हे बियाणे कृषी केंद्राचालकांनी आणले कोठून? हा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. राशी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिवसभर चौकशीसाठी दूरध्वनी वरून संपर्क केला मात्र या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळटाळ केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here