विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूच्या धक्‍क्‍याने महिला प्राचार्याचे निधन 

कपूरथळा (पंजाब): आपल्या एका विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने महिला प्राचार्याचे निधन झाले आहे. पंजाबच्या कपूरथळा जिल्ह्यातील तलवडी महिमा गावात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किड्‌स हेवन पब्लिक स्कूल या खासगी शाळेच्या स्कूल बसने शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जात होते.

दारात उभ्या असलेल्या इयत्ता 10 वीतील एका विद्यार्थ्याच्या हातातील पट्टी खाली पडली. ती उचलण्यासाठी तो वाकला, तेवढ्यात रस्त्यातील खड्ड्याने गाडीला जोरात धक्का बसला आणि वाकलेल्या विद्यार्थ्याचे डोके बाजूच्या घराच्या भिंतीवर आपटले. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन स्कूल बसचा ड्रायव्हर आणि महिला हेल्पर फरार झाले.

ही घटना समजताच महिला प्राचार्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत महिला प्राचार्य, स्कूलबसचा ड्रायव्हर आणि शाळा व्यवस्थापनावर केस दाखल केल्याची माहिती पोलीस स्टेशनप्रमुख सुखपाल सिंह यांनी सांगितले. मृत विद्यार्थ्याचे नाव शिवम राम शरण असून तो औजला फाटकचा रहिवासी होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)