पंतप्रधानपदाची चर्चा बाथरुममध्ये

पडद्यामागे : सुधीर मोकाशे

पंतप्रधानपदी असताना झालेल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान कुणाला नेमायचे असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यावेळी प्रणव मुखर्जी यांना हंगामी पंतप्रधान बनवावे अशी चर्चा सुरू होती. मुखर्जी यांनी आपल्या “द टर्ब्युलेंट इअर्स 1980-96′ या पुस्तकात लिहिले आहे की, त्यावेळी मी पंतप्रधान बनण्यास इच्छुक असल्याच्या कपोलकल्पित कहाण्या पसरवण्यात आल्या. मी पंतप्रधानपदावर दावा केला होता, पण माझी समजूत काढून गप्प करण्यात आले अशा कंड्याही पिकवल्या गेल्या. या चर्चांमुळे राजीव गांधी यांच्या मनात अकारण माझ्याविषयी शंका निर्माण झाली.

मला राजीव गांधींना भेटायचे होते. मी राजीव आणि सोनियाजींकडे गेलो. राजीव गांधींच्या खांद्याला हलका स्पर्श केला. प्रकरण गंभीर आणि गोपनीय नसते तर मी त्रास द्यायला येणार नाही, हे राजीव गांधींनी अचूक ओळखले. त्यांनी लगेचच मला त्यांच्या खोलीच्या बाथरुममध्ये नेले. जेणेकरून कुणीही व्यक्‍ती आम्हा दोघांना बोलताना किंवा चर्चा करताना पाहू नये ! त्या बाथरुममध्ये आम्ही दोघांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि राजीव गांधी यांना पंतप्रधान बनवण्याविषयीची कॉंग्रेसजनांची मते याविषयी चर्चा केली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान बनण्यास तयार झाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)