पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातून करणार प्रचाराला सुरुवात 

२८ मार्चला फोडणार प्रचाराचा नारळ 

वर्धा: आगामी लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी अनके राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. सध्या भाजप-शिवसेना युतीचा प्रचार सुद्धा जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मार्चला (गुरुवारी) महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणजेच वर्धा येथून प्रचाराला सुरवात करणार आहेत. याच दरम्यान, नरेंद्र मोदी महात्मा गांधींना अभिवादन करून काँग्रेसविरुद्ध रणशिंग फुंकणार आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकी दरम्यान नरेंद्र मोदींनी आपली सभा वर्धा येथेच घेतली होती. ही सभा वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यानंतर भाजप संपूर्ण देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु करणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)