पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले “रोजलॅण्ड’चे कौतुक

सोसायटीने केलेल्या उपाययोजना
दोनशे रेन वॉटर फिल्टर्सच्या माध्यमातून 19 बोअरवेलमध्ये पाणी
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाद्वारे शोधला पाणी टंचाईवर उपाय

पिंपरी – शहरातील मोठ-मोठ्या सोसायट्या सातत्याने पाणी टंचाईचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत पिंपळे सौदागर येथील रोजलॅण्ड रेसिडेन्सी या सोसायटीने पावसाचे पाणी साठवण्याचा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रकल्प राबवून पाणी टंचाईवर मात केली आहे. या उपक्रमात दोनशे रेन वॉटर फिल्टर्सच्या माध्यमातून 19 बोअरवेलमध्ये पाणी सोडले जाते. सोसायटीच्या या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 1) ट्‌वीट करून कौतुक केले.

भूजल पुनर्भरण या पद्धतीमध्ये इमारतींच्या/घरांच्या छतावर पडून वाहून जाणारे पावसाचे लाखो लिटर पाणी जमिनीत जिरविले जात आहे. इमारतींच्या छतावरील पाण्यासाठी 200 रेन वॉटर फिल्टर्स उपयोग करुन 19 बोअरवेलमध्ये सोडले जात आहे. यामुळे पाण्याचा दर्जा देखील सुधारला आहे. 90 टक्के घरांमध्ये वॉटर एरिएटर्सची अंमलबजावणी केली. त्यामुळे दररोज एक लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.

 

रोजलॅण्ड सोसायटीमध्ये आम्ही पाणी बचत आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासह विविध उपाययोजना केल्या आहेत. शहरातील अन्य सोसायट्या देखील असा उपक्रम राबवुन पाणी समस्येवर उपाय शोधू शकतात.

– संतोष म्हसकर, अध्यक्ष, रोजलॅंण्ड सोसायटी, पिंपळे सौदागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)