पंतप्रधान नरंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसांच्या द. कोरिया दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसांच्या द. कोरिया दौऱ्यावर जाणार आहेत. शुक्रवारी त्यांना सेओल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जगाला मोदीनॉमिक्‍स, मोदी सिद्धांत आणि ऍक्‍ट ईस्ट पॉलीसी दिल्याबद्दल आणि विश्‍व आर्थिक सहयोग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला उत्तेजन देण्याच्या कार्यासाठी त्यांना सेओल शांती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दर दुसऱ्या वर्षी जगातील प्रसिद्ध मान्यवर लोकांना हा सन्मान दिला जातो. सेओल पीस प्राईज कल्चरल फाऊंडेशनने ऑक्‍टोबर महिन्यात या पुरस्काराची घोषणा केली होती.

दक्षिण कोरिया हा देश सामरिक आणि अन्य क्षेत्रांतही भारताचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आणि अन्य नेत्याबरोबर पंतप्रधान मोदी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत. सन 2018 शिखर संमेलनादरम्यान दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांनी भारतात येऊन गेलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दस्क्षिण कोरिया दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारत-कोरिया व्यापारी परिषदेत भाषण करणार आहेत, भारत-कोरिया स्टार्ट अप हबचा शुभारंभ करतील आणि एका विद्यापीठातील महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी चॅंपियन ऑफ अर्थ ऍवार्ड (2018), द किंग अब्दुल्ला अजीज ऍवार्ड (2016), आमीर अमानुल्लाह ऍवार्डसनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)