बाबासाहेब म्हणायचे काँग्रेसमध्ये सहभागी होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं ! -पंतप्रधान

हजारो करोड रुपयांची लागत करून १९९९ पासून रेंगाळत पडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षीच्या आयकर आकडेवरीमधून एक नवा आकडा समोर आला आहे, गेल्या चार वर्षांमध्ये देशामध्ये ६ लाख ३५ हजार नवीन प्रोफेशनल्स जोडले गेले. तुम्हाला काय वाटत जर एखाद्या डॉक्टरने नवीन दवाखाना सुरु केला तर तो एकाच व्यक्तीला रोजगार देईल? एखाद्याने चार्टर्ड अकाउंटनचा व्यवसाय टाकला तर तो एकाच व्यक्तीला व्यवसाय देईल? : पंतप्रधान नरेंद्र मोदी   

२०१७ ते २०१८ या केवळ १५ महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास १ कोटी ८० लाख लोकांनी पहिल्यांदाच फंडामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली. यातील जवळपास ६४% २८ वर्षांखालील युवक आहेत. : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

आमच्या सरकारने भारतीय जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी काम केल आहे. भारतामध्ये सध्या गुढगा प्रत्यारोपण शास्त्रक्रिया आणि औषधांच्या कमी किंमती सरकारच्या पारदर्शक व्यवहाराची ग्वाही देतात आणि यामुळे समाजातील शेवटच्या स्थरापर्यंत राहत मिळत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी    

काँग्रेसच्या काळामध्ये एलईडी बलांच्या किंमती जास्त का होत्या? : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

महागाई आणि काँग्रेस हे जोडगोळीप्रमाणे आहेत. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेत येते तेव्हा तेव्हा महागाई वाढते, याउलट केंद्रातील भाजप सरकारने महागाई आटोक्यात ठेवली आहे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

भारतातील हजारो संस्थांना परदेशातून पैशांचा पुरवठा केला जात होता. आम्ही या संस्थांना व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी बजावले मात्र अशा संस्थाच आपोआप बंद पडल्या. भारतामध्ये असा बेहिशोबी पैसा आणला जाण्याचे कारणच काय होते? यावर याआधीच्या सरकारने लगाम का लावला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

आज मी हे लोकसभेमध्ये उभा राहून सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला आपल्या देशातील सैन्यदलाला बलशाली बनण्यापासून रोखायचे आहे. काँग्रेसला देशाच्या सैन्य दलाकडील हत्यारे आधुनिक बनवण्यामध्ये रस नाही त्यामुळेच काँग्रेस असा निर्लज्ज व्यवहार करत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी  

अभिभाषणातील ठळक मुद्दे 

 • जागतिक मंचावर भारताचं मत घेतलं जातं आणि एखाद्या करारावेळी भारताला विचारलं जातं. पॅरिस करार याचं उत्तम उदाहरण आहे
 • शेतकऱ्यांसाठी रखडलेल्या ९९ योजना आम्ही पूर्ण केल्या
 • स्किल, स्टार्टअप, मुद्रा योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या
 • जीएसटी परिषदेत सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो आणि त्यांच्या सहमतीनेच निर्णय घेतले जातात. त्यामुळे काँग्रेसने यावर आरोप लावू नयेत
 • वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना दीड कोटी रोजगाराच्या संधी मिळाल्या
 • निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसनं कर्जमाफीचं षडयंत्र रचण्याचं काम केलं
 • देशात दुप्पट गतीनं महामार्ग व घरांची निर्मिती होत आहे
 • लसीकरण पूर्वीपासून सुरू होतं. मात्र, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही केलं
 • १०० रुपयांची औषध आता अवघ्या ३० रुपयांत मिळत आहेत
 • ११ लाख कुटुंबीयांनी आयुषमान भारत योजनेचा लाभ घेतलाय
 • ९९ टक्के सामानावरील कर १८ टक्क्यांखाली आणला आहे
 • २०२३ मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो ; विरोधकांना टोला
 • काँग्रेसचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर आले तेव्हा महागाईच्या दरात नेहमी वाढ झालेली आहे
 • काँग्रेसमध्ये सहभागी होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं !,असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)