पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अडीच कोटीची मालमत्ता

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याबाबत लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. मोदींच्या अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी आहे. तर मोदींच्या हातात फक्त 38 हजार रुपये रोकड आहे.
मोदींची चल (जंगम) संपत्ती 1.41 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर अचल (स्थावर) संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. मोदींवर एकाही रुपयाचे कर्ज नाही. सरकारकडून मिळणारा पगार आणि बॅंकेतून मिळणारे व्याज हे मोदींच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

पाच वर्षांतील वार्षिक उत्पन्न
2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये
2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये
2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये
2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये
2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये

चल (जंगम) मालमत्तेचे विवरण :
रोख रक्कम – 38 हजार 750 रुपये
बॅंकेतील रक्कम – 4 हजार 143 रुपये
बॅंकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 574 रुपये (एसबीआय)
बॉंड – 20 हजार रुपये (एल अँड टी)
एनएससी – 7 लाख 61 हजार 466 रुपये
विमा – 1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी)
सोने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये)

85 हजार 145 रुपयांचा टीडीएस मोदींना आयकर विभागाकडून गोळा करायचा आहे. तर पंतप्रधान कार्यालय मोदींना 1 लाख 40 हजार 895 रुपयांचं देणं लागतं.

नरेंद्र मोदींनी आपल्या नावे कोणतीही जमिन किंवा व्यावसायिक इमारत नसल्याचं जाहीर केलं आहे. गांधीनगरमधील एका सदनिकेत त्यांची 25 टक्के मालकी आहे. मोदींच्या मालकीचा 1.10 कोटी रुपये इतका बाजारभाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)