प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा केरळ दौरा, ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर

केरळ येथील अतिवृष्टी आणि पूर यांमुळे केरळ राज्याला मोठया प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळी केरळचा हवाई दौरा केला. त्यानंतर त्यांनी या नेसर्गिक आपत्तीतून केरळला सावरण्यासाठी ५०० कोटी रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

केरळ येथील स्थिती खूप गंभीर आहे. तेथील हवामान खात्याने आज आणि उद्या देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज सकाळी खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदी यांची केरळमधील पाहणी थोडी लांबणीवर पडली होती. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासोबत केरळ मधील पुराची पाहणी केली. अश्या परिस्थितीत देखील तेथील लोक संकटाचा सामना करताहेत. त्या लोंकाना मोदींनी सलाम केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी १२ ऑगस्टला १०० कोटी रुपयांची मदत झहीर केली होती. त्यात आणखी वाढ करत मोदी यांनी ५०० कोटी रक्कम तात्काळ आपत्ती निवारणासाठी जाहीर केली. त्याचबरोबर त्यांनी मृतांच्या परिवारास२ लाख रुपये आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये राष्ट्रीय मदत निधीतून देण्याचे जाहीर केले आहे.

केरळ येथे ३० सेन्यदलाच्या हेलिकॉप्टर आणि ३२० बोटींच्यासाहाय्याने मदतकार्य चालू आहे. पूर परिस्थिती आणि भूस्खलन यामध्ये अडकलेल्या  नागरिकांना  बचावकार्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य जोरात चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)